शिक्षण, समाज आणि शाश्वत विकास

Description

सारांश :

‘शिक्षण, समाज आणि शाश्वत विकास’ या लेखामध्ये मानव, समाज आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या वेगवान विकास प्रक्रियेमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेकी वापर, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण झाल्याचे लेखक स्पष्ट करतात. विकासाच्या नावाखाली संपत्ती व सत्तेचे केंद्रीकरण झाल्याने समाजातील बहुसंख्य घटक मूलभूत गरजांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विद्यमान विकास मॉडेल सर्वसमावेशक नसून सामाजिक व पर्यावरणीय विषमता वाढवणारे ठरले आहे. मानव आणि निसर्ग यांचे दीर्घकालीन कल्याण साधण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक मूल्ये आणि शाश्वत विकासाची दृष्टी निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. शाश्वत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण, सामाजिक समता आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय आवश्यक असल्याचा निष्कर्ष लेखक मांडतात.

Authors

DOI: 10.5281/zenodo.20744825

Publication Date: 2026-03-31

Back to publications list


About