बाळशास्त्री जांभेकर व लोकहितवादी यांचे उदारमतवादी विचार

Description

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये उदारमतवादी विचारसरणीचा विकास झाला होता. त्याचा प्रभाव भारतावर परिणामता: महाराष्ट्रावर पडला होता. पाश्चात्य शिक्षण घेऊन जो प्रबोधनातील चळवळीमध्ये सक्रीय झालेला एक नवीन वर्ग उद्याला आला होता. प्रस्तुत  वर्ग उदारमतवादी विचारसरणीने प्रभावित झाला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादी विचारवंतावर उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला होता. प्रस्तुत विचारवंत हे उदारमतवादी विचारांनी भारावलेले होते. महाराष्ट्रामध्ये जो उदारमतवाद स्वीकारला गेला त्या उदारमतवादाला सामाजिक सुधारणेची जोड होती. महाराष्ट्रामध्ये जो सुशिक्षित विचारवंतांचा, समाजसुधारकांचा समूह होता तोच समूह राष्ट्रीय नेते अशी परिस्थिती एकोणिसाव्या शतकामध्ये होती त्याला राष्ट्रीयत्वाचा देखील संबंध होता.

Authors

DOI: 10.5281/zenodo.20293451

Publication Date: 2026-05-19

Back to publications list


About