या संशोधनाचा उद्देश 12 ते 16 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या आहार सवयी व पोषण स्थितीचा अभ्यास करणे हा आहे. या अभ्यासासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. माहिती संकलनासाठी प्रश्नावली, उंची-वजन मापन (BMI) आणि एक दिवसाच्या आहार सर्वेक्षण (24-hour dietary recall) पद्धतीचा वापर करण्यात आला.
अभ्यासातून असे आढळून आले की विद्यार्थ्यांमध्ये असंतुलित आहार सवयी, जंक फूडचे जास्त सेवन आणि पोषणातील कमतरता आढळते. BMI विश्लेषणातून काही विद्यार्थी कुपोषित तर काही लठ्ठ असल्याचे दिसून आले.
या निष्कर्षांवरून विद्यार्थ्यांमध्ये पोषणाविषयी जागरूकता वाढविण्याची व संतुलित आहार प्रोत्साहन देण्याची आवश्यकता अधोरेखित होते.
Publication Date: 2026-05-09