सादर संशोधनात पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय आर्थिक विकासाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असून, विकासाचे मूल्यांकन उत्पन्न, रोजगार आणि पायाभूत सुविधा या प्रमुख सूचकांकांच्या आधारे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही तालुके औद्योगिकीकरण, सेवा क्षेत्राचा विस्तार आणि शहरीकरणामुळे उच्च आर्थिक प्रगती साधत असताना, कृषीप्रधान व ग्रामीण तालुक्यांमध्ये विकासाचा वेग तुलनेने मंद आढळतो. प्राप्त निष्कर्षांतून असे स्पष्ट होते की आर्थिक संधी, रोजगारनिर्मिती, परिवहन व सामाजिक पायाभूत सुविधा यांचे प्रदेशनिहाय केंद्रिकरण झाल्यामुळे निर्माण झाला आहे. अभ्यासात विकासातील या तफावतींचे स्वरूप, क्षेत्रीय विषमतेची कारणमीमांसा आणि संतुलित प्रादेशिक विकासासाठी आवश्यक हस्तक्षेपात्मक क्षेत्रे अधोरेखित करण्यात आली आहेत. प्रस्तुत संशोधन जिल्हास्तरीय नियोजन, धोरणनिर्मिती आणि स्थानिक विकास रणनीतींसाठी उपयुक्त मार्गदर्शन प्रदान करते आणि समावेशक व संतुलित आर्थिक विकासाची आवश्यकता अधोरेखित करते.
Publication Date: 2026-02-16