आर्थिक विषमतेचा शिक्षणावर होणारा परिणाम : एक चिकित्सक अभ्यास

Description

प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा तेथील लोकसंख्येवर आधारित असतो, परंतु लोकसंख्या ही शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात लोकांचा कल हा सरकारी शाळांवरून खाजगी शाळांकडे जात आहे. कारण प्रत्येक पालकाला आपले पाल्य चांगले, दर्जेदार शिक्षण घ्यावे असे वाटते. परंतु खाजगी शाळांच्या फी या सर्वांनाच परवडतील अशा नाहीत त्यातच एक नवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात प्रभुत्व निर्माण करताना दिसत आहे ते म्हणजे 'खाजगी शिकवण्या' होय. त्यामुळे ज्यांना खाजगी शाळा तसेच खाजगी शिकवण्याची फी परवडेल त्यांना चांगली शिक्षण मिळेल अन्यथा जो गट आर्थिक दृष्ट्या असक्षम आहे. त्यांना चांगल्या शिक्षणापासून वंचित राहावे लागते व त्यांचा विकास होत नाही. नेल्सन मंडेला यांनी असे म्हटले होते की "शिक्षण हे सर्वांसाठी उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. ठराविक वर्गापुरते शिक्षण मर्यादित असल्यास समाजामध्ये त्या वर्गाचे प्रभुत्व निर्माण होईल जे लोकशाहीसाठी मारक ठरेल". चांगले व दर्जेदार शिक्षण सर्वांना उपलब्ध होण्यासाठी सरकारने उपाययोजना व सुधारणा करणे गरजेचे आहे. तरच या परिस्थितीमध्ये बदल होईल आणि शिक्षण जे की सध्या एक बाजार घटक मध्ये रूपांतरित झाले आहे ते पुन्हा एक सर्वसामान्यांसाठीचा अधिकार बनेल.

Authors

DOI: 10.5281/zenodo.18655098

Publication Date: 2026-02-16

Back to publications list


About