तमाशा ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाची, जिवंत व लोकाभिमुख कला आहे. लावणी, गवळण, भारूड, विनोद, नृत्य, गायन आणि नाट्य यांचा समन्वय असलेली ही कला ग्रामीण तसेच निमशहरी समाजाच्या मनोरंजनाचे व सामाजिक भाष्याचे प्रभावी माध्यम राहिली आहे. "मराठी व्युत्पत्ती कोशात 'तमाशा' शब्दाचा अर्थ 'तमाशा' म्हणजे दृश्य, प्रदर्शन, करमणुकीचा देखावा, समारंभ, गंमत, मजेदार दृश्य, कुस्ती, लढाई, नाटक इत्यादी.”१ तमाशा केवळ करमणूक नसून तो लोकजीवनातील दुःख, संघर्ष, प्रेम, शोषण, सामाजिक विषमता यांचे प्रतिबिंब मांडणारी लोकनाट्यपरंपरा आहे.
Publication Date: 2026-02-16